खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या खेळाडूनी गुंजी येथे पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेतील सांघीक खेळात मुलाच्या कब्बडी संघाने प्रथम क्रमांक, तर मुलाच्या व्हाॅलीबाल संघाने व्दितीय क्रमांक पटकाविला.
वैयक्तीक स्पर्धेत स्पर्धेत ज्ञानेश्वर गाडी याने २०० मीटर धावणे आणि ४७ किलो वजनी गटातील कुस्तीत व्दितीय क्रमांक, बाळकृष्ण घाडी याने ५० किलो वजनी गटातील कुस्तीत प्रथम क्रमांक पटकाविला, तसेच मुलीच्या गटातील वैयक्तीक स्पर्धेत पुजा पाटील हिने ६०० मीटर धावणे व्दितीय क्रमांक पटकाविला. समिक्षा पाटील हिने ३५ किलो गटातील कुस्तीत व्दितीय क्रमांक पटकाविला. योगा क्रिडा स्पर्धेत मुलाच्या गटातील संकल्प घाडी, कुणाल देवलतकर, बाजीराव पाटील, शिवाजी पाटील, वंदराज घाडी, तसेच मुलींच्या गटात पुजा पाटील, समिक्षा पाटील, निरंजना भोसले, प्रगती पाटील, आदी यश संपादन केले आहे.
विजयी स्पर्धेकाना क्रीडा शिक्षक एम. एम. पाटील याचे मार्गदर्शन तर प्रभारी मुख्याध्यापक बी.
व्ही. पाटील, व्ही. ए. परब, एन. एल. शिवनगेकर, एम. जे. कुंभार, पोर्णिमा भेकणे व एसडीएमसी अध्यक्ष सदानंद मासेकर व सदस्यांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta