
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथे नुकताच झालेल्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत समर्थ इंग्रजी शाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
प्राथमिक विभागातून अनिकेत सावंत, अथर्व चौगुले, या खेळाडूंनी कुस्ती दोरी उड्या, बॅटमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
हायस्कूल विभागातून दत्तराज पाटील, श्रेया चौगुले, मलप्रभा नांदुरकर या खेळाडूंनी कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक तर यशवर्धन नाडगौडा याने बॅडमिंटनमध्ये क्रमांक पटकाविला. त्यामुळे
बेळगाव येथे होणाऱ्या जिल्हा क्रीडास्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली आहे.
शाळेचे सचिव डाॅ. डी ई नाडगौडा, अध्यक्ष एफ एम पाटील, संचालक एन एल कदम, अरविंद जोरापूरे, पी एन पाटील, सातेरी पुन्नूचे, नारायण चोपडे, सुरज मोरे, बीईओ राजेश्वरी कुडची, बीआरपी श्री. अंबगी, पीडीओ एस एल मिरजे, सीआरपी जनकट्टी आदीनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले
यासर्व स्पर्धकांना मुख्याध्यापिका व क्रिडा शिक्षक रामचंद्र पाटील व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta