खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल समोर छोटाहत्ती रिक्षा लावतात. हॉस्पिटलला जाताना रुग्णांना अडचण होते. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी छोटाहत्ती रिक्षा लावतात ते बाजूला करून लावण्याची व्यवस्था करावी आणि दोन दिवसापूर्वी छोटाहत्ती KA22D2817 हा रिक्षावाला हॉस्पिटलला आलेल्या कार चालकाला दादागिरीची भाषा बोलत होता. इथं आमचे रिक्षा स्टॅन्ड आणि आमच्या गाड्या येतात तिथे गाडी लावायची नाही अशी भाषा बोलत होता. त्यासाठी हॉस्पिटलला अडचण निर्माण होऊ नये म्हणून आणि रुग्णांना त्रास होऊ नये व ट्राफिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून अन्य ठिकाणी लावण्याची व्यवस्था संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, अशी जनतेच्या मनातून मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta