खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही पाच सप्टेंबर रोजी बेळगाव येथील कुमार गंधर्व येथे होणाऱ्या शिक्षक दिन कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना यंदाचा जिल्हा आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे मानकरी निडगल मराठी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ कुंभार, आंबोळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. कुंभार, शिरोली मराठी शाळेचे शिक्षक शिवाजी गावडे, नेरसेवाडी मराठी शाळेचे शिक्षक गोपाळ पाटील तसेच शिवाजीनगर खानापूर मराठी शाळेचे कन्नड शिक्षक बी. व्ही. गडाद, तर कक्केरी कन्नड शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. केळीकेतर आदीना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
सोमवारी दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त बेळगाव येथील कुमार गंधर्व सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे. त्याबद्दल खानापूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातुन तसेच जनतेतून अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta