खानापूर (प्रतिनिधी) : नेरसेवाडी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ पाटील यांना यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल नेरसेवाडी गावच्या ग्रामस्थाच्यावतीने तसेच शाळा सुधारणा कमिटीच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गोपाळ पाटील यांचा सपत्नीक सत्कार सोहळ्याचे आयोजन नुकताच पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नजिलकोडल पंच कमिटीचे अध्यक्ष सुरेश रामचंद्र पाटील होते. तर प्रमुख पाहुणे शिवा बागवाडकर, आरोग्यापा पादनकट्टी, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रल्हाद पाटील, यल्लापा अशोक पाटील, कृष्णाजी पाटील पीकेपीएस संचालक हौशी आदी उपस्थित होते.
यावेळी गोपाळ पाटील यांचा सपत्नीक शाल, पुष्पहार, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती गोपाळ पाटील यांनी 30 वर्षाच्या शिक्षकीसेवेत शाळांच्या प्रगतीसाठी सतत मेहनत घेतली. शाळेच्या प्रगतीबरोबर गावातील सामाजिक क्षेत्रात मंदिराची उभारणी, गावच्या सांस्कृतिक कार्यक्रमात, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्यात नेहमी पुढाकार घेण्यात सिंहाचा वाटा असे. त्यांनी विद्यार्थी वर्गाला चांगले मार्गदर्शन करून उच्च शिक्षित शिक्षणाबरोबर चांगल्या हुद्द्यावर त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत.
यावेळी शिक्षक सोसायटी अध्यक्ष बबन पाटील, कृष्णा कौंदलकर, बी. बी. चापगावकर, रमेश कवळेकर, पी. बी. आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हणमंत पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta