खानापूर (प्रतिनिधी) : 14 सप्टेंबर हा दिवस भारत सरकार हिंदी दिन म्हणून साजरा करतात. 400 वर्षापूर्वीच्या इतिहासातील हिंदी भाषा दिन एकीकडे साजरा केला जातो. मात्र अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असलेली कन्नड भाषा आठवण येत नाही. तेव्हा कर्नाटक राज्यात हिंदीची सक्ती करू नये. याला खानापूर तालुका जनता दल सेक्युलर पक्षाचा कडाडून विरोध असल्याचे निवेदन तहसीलदार प्रविण जैन यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना बुधवारी दि. 14 रोजी देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटकात कन्नड, कोकणी, तुळ, कोडू, कोडव आदी दहा भाषाचे नागरिक आहेत. मात्र कर्नाटक राज्यातील जनतेवर हिंदी भाषेची सक्ती लादु नका, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी खानापूर तालुका जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात जांबोटी क्रॉसवरून जनता दलाचे नेते नासीर बागवान यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवस्मारक चौकातील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालावर नेण्यात आला. यावेळी जनता दलाच्या कार्यकर्त्यानी घोषणाबाजी केली व निवेदन सादर केले.
निवेदन देताना खानापूर तालुका जनता दल पक्षाचे नेेते नासीर बागवान, तालुका अध्यक्ष एम. एम. सावकार, एल. बी. बिच्चनावर, विरय्या हिरेमठ, युवा अध्यक्ष एम. ए. इनामदार, रमीज बागवान, गोपाळ बाबशेट, यल्लापा कातगार, विठ्ठल शिंदोळकर, देवेंद्र गवी, मंजुषा चवलगी, इराय्या कुरबर, शिवानंद इटगी, रामा गावडे, नासीर तिगडी, दस्तगीर हुबळीकर, देमाणी चलवादी आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta