खानापूर (तानाजी गोरल) : खानापूर तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून चोरांचा धुमाकूळ चालू आहे. गोरगरीब शेतकरी लोक घरात नसलेचे पाहून दिवसाढवळ्या घरफोड्यांचे सत्र चालू आहे. बेळगाव जिल्हा एसपी डॉ. संजीव पाटील यांना घरफोड्यांना आळा घालण्यासाठी व चोरांना जेरबंद करण्यासाठी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी सोबत जांबोटी ग्रामपंचायत सदस्य श्री. सुनिल देसाई, जांबोटी पीकेपीएस संचालक श्री. जयवंत देसाई, पारवाड ग्रामपंचायत सदस्य श्री. बाबाजी गावडे व इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta