
खानापूर : खानापूर भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी व बेळगाव ग्रामीण भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील तावरगट्टी गावात महालक्ष्मी मंदिर परिसरात नियती फाऊंडेशन आणि नंदादीप हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र उपचार शिबिराचे आयोजन केले होते. तालुक्याच्या सीमेवरील घनदाट वनपरिक्षेत्रातील तावरगट्टी येथील आजूबाजूच्या गावातील लोकांना सेवा.
यावेळी भाजपचे बूथ अध्यक्ष देवराज मिराशी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्लाप्पा कंग्राळकर होते.
यावेळी परशुराम कोलकार बोलताना म्हणाले की, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डोळा हा माणसाचा महत्त्वाचा भाग आहे, त्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना मदत करणे हाच आमचा उद्देश असल्याचे सांगून डॉ. सोनाली सरनोबत यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी या शिबिराचे आयोजन करून दुर्गम भागातील जनतेचा एक आशेचा किरण दाखविला आहे.
या शिबिरात भाजप नेते नागेश रामजी, सचिन पाटील, राजू काकतकर, श्रीनाथ हुलमणी, महिला नेत्या भारता ठक्कडी आदी तसेच डॉ. सोनाली सरनोबत यांचे सहकारी सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta