खानापूर (प्रतिनिधी) : कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावचे प्रगतशिल शेतकरी मल्लाप्पा नारायण पाटील यांनी शेतकी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी आणि आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती चिकोडी यांच्या विद्यमाने कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातुन आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मल्लाप्पा नारायण पाटील यांना म्हैसूर फेटा, म्हैसूर हार, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. हा कार्यक्रम बेळगाव अशोक नगर येथील धर्मनाथ भवन येथे नुकताच पार पडला.
यावेळी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, हिंगोलीचे आमदार निलेश लंके, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta