खानापूर (तानाजी गोरल) : कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची 9 नोव्हेंबर रोजी खानापूर जांबोटी क्रॉस येथील श्री मलप्रभा क्रीडांगणावर भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा होणार व राज्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार असून त्या संबंधी चर्चा करण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील झेडपी विभागवार जागृती करून मुख्यमंत्र्यांची सभा ठरविण्यात प्रमाणात यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले. आज झालेल्या बैठकीला भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा नेते बाबुराव देसाई, भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर, जनरल सेक्रेटरी गुंडू तोप्पीनकट्टी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta