खानापूर (प्रतिनिधी) : दोड्डहोसुर (ता. खानापूर) गावाला स्मशानभूमीची समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून भेडसावत आहे. याची दखल घेत गावापासून जवळ असलेल्या डोंगरातील दीड एकर गावठाणात माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांनी स्वखर्चातून १० तास जेसीबीच्या सहाय्याने जमिन सपाटीकरण करून स्मशानभूमीची व्यवस्था केली.
यावेळी माजी मुख्याध्यापक एन. एम. पाटील यांनी या कामाचे कौतुक करत गावच्या स्मशानभूमीची व्यवस्था आजपर्यंत नसल्याने अनेक समस्याना नागरिकांना तोंड द्यावे लागले. गावाला स्मशानभूमीची व्यवस्था असणे गरजेचे आहे.
यासाठी माजी ग्राम पंचायत सदस्यांचा पुढाकार महत्वाचा ठरला व त्यांनी १० तास जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण केले. यापुढे ही स्मशानभूमीत शेड उभारण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जी. एस. बुधवारी गुरूजी यांनी २००० रूपये, निवृत्त मुख्याध्यापक एन. एम. पाटील यानी १००० रूपये, मधू पाटील यानी ५०० रूपये अशी आर्थिक मदत स्मशानभूमी सपाटीकरणावेळी देऊ केली.
यापुढे दानशूर व्यक्तींची मदत घेऊन स्मशानभूमीत चांगल्या प्रकारे शेड उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
याप्रसंगी तुकाराम पाटील, सुभाष गुरव, गावचे पंच रामराव पाटील, विठ्ठल गुरव, गंगाराम पाटील, नागेश देवलतकर, मल्लाप्पा पाटील, संतोष जाळके आदी नागरिक स्मशानभूमी सपाटीकरण करतेवेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta