खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराची वाढती लोकसंख्या तसेच वाढत्या वसाहती यामुळे खानापूर नगरपंचायला मलप्रभेतून पाणी पुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागते.
यासाठी खानापूर नगरपंचायतीचे स्थायी समितीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर यांनी खानापूरातील नव्या पुला जवळील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊसला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी नगरपंचायतीचे स्थायी समिती चेअरमन प्रकाश बैलूरकर यांनी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना व स्वच्छता कर्मचारी वर्गाला फिल्टर हाऊसला किमान १५ दिवसातून एकदा स्वच्छता करण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे खानापूर शहराला योग्य पाणी पुरवठा होणार आहे म्हणून खानापूर शहरवासीयांतून समाधान पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta