बेळगाव : “बेळगांव वार्ता”च्या बातमीची दाखल घेत खानापूर शहरातील सांडपाण्याची प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी पाहणी केली. खानापूर शहराच्या सांडपाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नाही. हे पाणी गटारीतून खानापूर शहरातील मालप्रभा नदीमध्ये सोडण्यात येते. त्यामुळे मलप्रभेचे पाणी दूषित होत आहे. या संदर्भात कुप्पटगिरी येथील सामाजिक कार्यकर्ते जोतिबा पाटील यांनी नागरपंचायतील तक्रार दिली होती व कुप्पटगिरी, जळगा, करंबळ, चापगाव, याडोगा येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या संदर्भात “बेळगांव वार्ता” मधून बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली व प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अधिकारी श्री. जगदीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरपंचायतीचे चीफ ऑफीसर बाबासाहेब माने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबासाहेब माने म्हणाले की, कर्नाटक अर्बन वॉटर सप्लाय खात्याकडून 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या निधीतून शहरातील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारून हे सांडपाणी फिल्टर करून शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे अभियंते व इतर कर्मचारी व नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta