खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) हे गाव इदलहोंड ग्राम पंचायतीच्या हद्दीत येते. या गावाला गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा सुरळीत नाही. त्यामुळे खेमेवाडी ग्रामस्थांना अंधाराशी सामना करावा लागत आहे. या वैतागलेल्या खेमेवाडी नागरिकांनी हेस्काॅम खात्याला वारंवार टी सी बदलुन वीजपुरवठा सुरळीत करा, अशा मागणीचे निवेदन हेस्काॅमच्या अभियंत्या कल्पना तिरवीर यांना देण्यात आले आहे.
अद्याप उच्चदाबाची टी सी बदल्यात न आल्याने हे प्रसंग ओढवला आहे, असे खेमेवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
यावेळी बोलताना इदलहोंड ग्राम पंचायतीचे चेअरमन चांगाप्पा बाचोळकर म्हणाले की, हेस्काॅम खात्याला वारंवार उच्चदाबाची टी सी बसवुन वीज पुरवठा सुरळीत करा, अशी मागणी केलेली आहे.
गावात गिरण चालु करत असल्याने टी सी उडत आहे. असे हेस्काॅमचे म्हणणे आहे.
उच्चदाबाची टी सी बसविल्याशिवाय खेमेवाडी गावाचा वीजपुरवठा सुरळीत होणार नाही. यासाठी उच्चदाबाची टी सी मागविण्यात आली. व ती बसविल्यानंतर खेमेवाडी गावाचा वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. यासाठी इदलहोंड ग्राम पंचायतीकडून प्रयत्न सतत सुरू आहेत. लवकरच उच्च दाबाची टी सी बसवुन खेमेवाडी गावाचा वीजपुरवठा सुरळीत करू.
Belgaum Varta Belgaum Varta