खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अष्टप्रतिनीधी मंडळाचा दौरा दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी बेकवाड ग्रामपंचायतीच्या हडलगा आणि खैरवाड या गावांमध्ये पार पडला. म. ए. समितीच्या व्यापक कार्यकारिणीसाठी दोन्ही गावांमधून दोन प्रतिनिधी पाठविण्याचे ठरविले आहे. यावेळी हडलगा येथील सभेचे अध्यक्ष व्यंकोबा ओऊळकर होते. यावेळी गावातील समितीप्रेमी शंकर यळ्ळुरकर, गणपती मडवाळकर, रविंद्र खानापूरकर, कृष्णा खानापूरकर, पी.जी. काद्रोळकर, तुकाराम खानापूरकर, विनायक ओऊळकर, लक्ष्मण खानापूरकर, नामदेव खानापूरकर, शट्टुप्पा खानापूरकर, मारूती खानापूरकर, तुकाराम मडवाळकर, वरुण खानापूरकर, पुंडलीक यळ्ळुरकर, तुकाराम ओऊळकर, जयवंत खानापूरकर, इत्यादींनी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला एकमुखी पाठिंबा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी समितीचे पदाधिकारी यशवंत बिर्जे, रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, हणमंत मेलगे, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, शामराव पाटील, अमृत पाटील, रुक्माणा झुंजवाडकर इत्यादींच्या नेतृत्वाखाली दौरा संपन्न झाला. तसेच खैरवाड येथे परशराम भुजगुरव यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या कार्यकारिणीवर खैरवाड गावाचे प्रतिनिधी पाठविण्यासाठी खालील सभासद उपस्थित होते. परशराम असोगेकर, प्रवीण कोलेकर, ज्योतिबा वाकाले, कल्लाप्पा बावकर, परशराम बावकर, अप्पाण्णा गुरव, गौराप्पा गुरव, मारुती असोगेकर, यल्लाप्पा झुंजवाडकर, महादेव हंगिरगेकर, मारुती गुरव, मर्यानी बावकर, गोपाळ भुजगुरव, दत्तू गुरव, नागाप्पा पाटील, गंगाराम पाटील, परशराम पाटील इत्यादींनी समितीच्या ध्येयधोरणाशी बांधील राहून सीमाप्रश्न सुटेपर्यंत आपण एकसंघ राहून म. ए. समितीची चळवळ अभेद्य राखायचे ठरविले व खैरवाड गावातून कार्यकारिणीवर दोन सदस्य पाठविण्याचे ठरविले आहे. रुक्माणा झुंजवाडकर यांनी आभार मानले, यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta