कोल्हापूर : भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी बहुल भाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. त्याविरोधात मराठी माणूस पेटून उठला यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हुतात्मा दिन पाळण्यात येतो. सीमावासीयांच्या नेहमीच पाठीशी असणाऱ्या कोल्हापूर वासीयांनी बिंदू चौकात हुतात्म्यांना अभिवादन केले यावेळी मध्यवर्तीचे नेते उपस्थित होते.
कोल्हापूर येथील बिंदू चौकमध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी मध्यवर्ती समीतीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, युवा आघाडीचे उपाध्यक्ष दता उघाडे, एस. जी. देसाई यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी बेळगाव येथील म. ए. समितीचे कायदे सल्लागार ऍड. महेश बिर्जे, जनसंंपर्क प्रमुख विकास कलघटगी, महादेव मंगणाकर, महेश जुवेकर, मारुती मरगाणाचे, सुनील आनंदाचे आदि उपस्थित होते.
यावेळी कोल्हापूर येथील अनेक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.