Sunday , December 7 2025
Breaking News

कागल-मुरगूड रस्त्यावर चालत्या गाडीचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू

Spread the love

मुरगुड : कागल मुरगुड रस्त्यावर व्हणाळी (ता कागल जि कोल्हापूर) च्याजवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला. गाडी जळत जळत घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. गाडी चालकाचा होरपळून मृत्यू झाला. पूर्ण जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडला आहे. घटनास्थळी कागल पोलीस दाखल झाले असून घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली आहे. पेटत गेलेली गाडी दरीत पडल्यानंतर परिसरातील गवतालाही आग लागली. कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली.

शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना समजली. पोलिसांनी जळालेल्या गाडीचा शोध घेतला असता गाडी नंबर MH 09 AQ 3703 असून अभिजित धनवडे यांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले. पोलीस गाडी मालकाचा शोध घेत असून ओळख पटवणे फार जिकरीचे आहे. दरम्यान गाडी घाटात गेल्यानंतर दोन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. घटनेची माहिती पत्रकार शिवाजी पाटील गोरंबे यांनी कागल पोलिसांना दिली. तात्काळ पोलीस आणि अग्निशमन घटनास्थळी पोहचले.

About Belgaum Varta

Check Also

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांकडून डॉक्टरांची झाडाझडती, निलंबनाचे आदेश…

Spread the love  कोल्हापूर : काल ठाकरे शिवसेने नेते कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयातील अव्यवस्थेवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *