Tuesday , March 3 2026
Breaking News

एम. पी. पाटील यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट व्यवस्थापन चेअरमन पुरस्कार’ प्रदान

Spread the love

 

कागल (प्रतिनिधी) : राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील यांना नवभारत नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्ड 2023 यांच्यावतीने दिला जाणारा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट व्यवस्थापन चेअरमन पुरस्कार’ मिळाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आला. याबद्दल शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व सर्व संचालक मंडळ यांनी एम . पी . पाटील यांचे अभिनंदन केले.
या पुरस्कार सोहळ्यानंतर चेअरमन मा. एम. पी. पाटील यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी राजे बँकेची यशस्वी गाथा सांगितली, त्याचबरोबर बँकेच्या व्यस्थापना विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बामणी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. अनुराधा पाटील उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापुरातील प्रेमीयुगुलांचे मृतदेह जंगलात आढळले!

Spread the love  कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या शेळेवाडीतील ओंकार उर्फ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *