
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज कोल्हापूर विद्यापीठ येथील वि. स. खांडेकर भाषा भवन येथे कोजिम कोल्हापूरतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष, बेळगाव मराठी साहित्य संमेलन संयोजक व नुकताच प्रदर्शित झालेले सीमाभागातील गौरवगीत ‘अखंड महाराष्ट्राचा लढा’ या गीताचे गीतकार म्हणून सीमाकवी रवींद्र पाटील यांचा साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते लेखक डॉ. किरण गुरव व शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रवींद्र पाटील हे चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष असून राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे उपक्रमशिल, तंत्रस्नेही अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. रवींद्र पाटील हे ‘कोजिम प्रेरणा पुरस्काराने सन्मानित आहेत.
आज कोजिम प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी नंदकुमार मोरे होते.
यावेळी व्यासपीठावर कोजिम अध्यक्ष राजेंद्र पाटील, पी डी पाटील, विजय सरगर, नेताजी डोंगळ, सोनल गाडेकर, मनिषा डांगे, कोजिमचे समन्वयक संजय साबळे, तालुका समन्वयक महादेव शिवणगेकर, बाबुराव पाटील, हणमंत पाऊसकर, कमलेश कर्णिक व कोल्हापूर जिल्हातील मराठी अध्यापक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta