शिरोळ : बस्तवड – अकिवाट ता. शिरोळ येथे काल (शुक्रवार) सकाळी दत्तवाड हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर महापुराच्या पाण्यातच उलटला होता. यामध्ये आठजण पाण्यात वाहून जात होते. त्यापैकी सरपंच पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाला होता. तर माजी जि. प. सदस्य इकबाल वैरागदार, आण्णासाहेब हसुरे दोघे पाण्यात वाहून गेले होते. या दोघांचाही शोध सुरू होता. त्यापैकी आज (शनिवार) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना शोध मोहिमेत माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला. दरम्यान हा मृतदेह अकिवाट, राजापूर दरम्यान मिळून आला. माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल वैरागदार यांचा अद्यापही शोध लागलेला नाही, शोध मोहीम सुरूच आहे.
Belgaum Varta Belgaum Varta