Sunday , July 26 2026
Breaking News

बस्तवड – अकिवाट दुर्घटनेतील आणखी एक मृतदेह सापडला!

Spread the love

 

शिरोळ : बस्तवड – अकिवाट ता. शिरोळ येथे काल (शुक्रवार) सकाळी दत्‍तवाड हद्दीत असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर महापुराच्या पाण्यातच उलटला होता. यामध्ये आठजण पाण्यात वाहून जात होते. त्‍यापैकी सरपंच पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाला होता. तर माजी जि. प. सदस्य इकबाल वैरागदार, आण्णासाहेब हसुरे दोघे पाण्यात वाहून गेले होते. या दोघांचाही शोध सुरू होता. त्यापैकी आज (शनिवार) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना शोध मोहिमेत माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह सापडला. दरम्यान हा मृतदेह अकिवाट, राजापूर दरम्यान मिळून आला. माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल वैरागदार यांचा अद्यापही शोध लागलेला नाही, शोध मोहीम सुरूच आहे.

About Belgaum Varta

Check Also

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Spread the love  आपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना कोल्हापूर : संभाव्य पूरस्थितीला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *