Thursday , November 21 2024
Breaking News

कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर येथील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला रात्री ९ दरम्यान आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन पथकाचे जवान कार्यरत झाले होते. अलीकडेच वारसा स्थळाला अनुसरून नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले होते.

केशवराव भोसले नाट्यगृहाला लागून असलेले ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान, देवल क्लब संगीत मंडळ आणि यादरम्यान असलेली खाऊ गल्ली यामुळे येथे रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. आग लागल्यानंतर तातडीने महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. त्यांच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र आग मोठी असल्याने ती विजवण्यासाठी अडचणी येत होत्या. सध्या मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेले नाही. परंतु केशवराव भोसले नाट्यगृहाचा काही भाग कोसळला असून छत कोसळले आहे.

अशी पसरली आग
गुंतागुंतीचे आणि अनावश्यक ठिकाणी केलेले वायरिंग, त्याच्यात देखभाल दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे आग प्रथम मागील बाजूस म्हणजे कुस्ती मैदानाच्या मंचाजवळ असणाऱ्या वीज नियंत्रण असणाऱ्या खोलीमध्ये लागली. तेथे ठिणग्या पडल्या. बाजूला असणाऱ्या नाट्यगृहातील लाकडी मंचाला आग लागली. त्या आगीमुळे वातानुकूलित यंत्रणेचा स्फोट झाला. पाठोपाठ आग मुख्य नाट्यगृहामध्ये पसरली. आत मध्ये पूर्ण लाकडी गॅलरी, खुर्च्यांचे कुशन, सिलिंग, लाकडी साहित्य लगेच पेटले. शाहू महाराजांचे वैभव पाहता पाहता संपुष्टात आले.
या आगीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, नाट्यगृहामध्ये अनावश्यक बदल करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीने केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदार जनजागृतीला गती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांच्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा कोल्हापूर (जिमाका): मतदानासाठी केवळ आठवडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *