पॅरिस : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले आहे. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्य पदक मिळवून दिले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्य पदक आहे. नीरज चोप्राने अंतिम फेरीत पाचपैकी ४ थ्रो नीरजचे फाऊल गेले पण त्याने दुसऱ्याच थ्रोमध्ये ८९ मी चा टप्पा गाठला आणि अर्शद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही. पाकिस्तानच्या अर्शद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी आला आहे.
भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राची सुरूवात फारच निराशाजनक झाली. पण त्याने दुसऱ्याच प्रयत्नात ८९.४५ थ्रो करत दुसरे स्थान निश्चित केले. पण पुढील तिन्ही थ्रो नीरजचे फाऊल राहिले, त्यामुळे तो निराशही दिसत होता. पण त्याचा दुसरा थ्रो इतका कमाल होता की त्याने आपले दुसरे स्थान कायम ठेवले.