कोल्हापूर : दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून केल्याची घटना शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नराधम मामा दिनेशकुमार केशनाथ साह (25, सध्या रा. दत्तनगर शिये, मूळ बिहार) याला रात्री उशिरा बेड्या ठोकल्या. करवीर तालुक्यातील शिये येथे बालिकेवर अत्याचार करून नराधमाने पीडितेचा गळा घोटून जीव घेतल्याने संतप्त पडसाद उमटत आहेत.
मुलीचा शोध सुरू असतानाच मामाची कामावर हजेरी
अचानक बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध सुरू असतानाच सायंकाळी तिचा मामा कामावर गेला. शेजारी राहणारे निर्मला पाटील, विलास पाटील, वंदना पाटील, आप्पासाहेब शिंदे, कांतिसिंह पाटील, सौरभ पाटील यांनी रात्री दहापर्यंत शियेसह परिसर पालथा घालत असला तरीही मुलीचा मामाने गांभीर्य दाखवले नसल्याने संशय बळावला. या संशयाने मामास अटक केली.
Belgaum Varta Belgaum Varta