Wednesday , April 16 2025
Breaking News

गरिबीचा फायदा घेत चार महिन्यांपासून भोंदू बाबाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Spread the love

कोल्हापूर : गरीबी आणि असहाय्यतेचा फायदा घेत अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून गेल्या चार महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उघडकीस आली. अल्पवयीन मुलीच्या आईने ह्युमन राईट संस्थेकडे मदत मागितल्याने अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबासह त्याला मदत करणाऱ्या महिलेला आणि वाहन चालकाला अटक केली आहे. राजाराम भिकाजी तावडे अस अटक केलेल्या भोंदू बाबाचं नाव आहे.

भोंदूबाबासह वाहनचालक मनोज सावंत (रा. भादोले, ता. हातकणंगले) आणि सुप्रिया हिम्मत पोवार (रा. सातवे, ता. पन्हाळा) यांना अटक करण्यात आली असून सर्वांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन पीडिता हातकणंगले तालुक्यामधील आहे. अटक केलेल्या सुप्रिया पोवारची पीडिताच्या आईशी ओळख झाल्यानंतर संस्थेत नोकरीवर ठेवले होते. या दरम्यान आर्थिक मदतीचे आमिष दाखवण्यात आले होते. मुलगी कामावर होताच याच सुप्रियाने भोंदू बाबा तावडेशी सुद्धा भेट घालून दिली. यानंतर तिन्ही आरोपींनी भविष्याची आमिषे दाखवून अघोरी पूजा करण्यास बसवलं होते. भोंदू तावडे गेल्या चार महिन्यांपासून पीडितावर अत्याचार करत होता.

About Belgaum Varta

Check Also

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत बाळूमामांचे दर्शन

Spread the love  कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *