नामदार हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर
कोल्हापूर : महराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर कर्नाटक सरकारने केलेली हद्दपारीची कारवाई रद्द करावी. या मागणीचे निवेदन नामदार हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना आज देण्यात आले. निवेदन देताना विजय देवणे, संजय पवार, प्रकाश शिरोळकर, अवधूत साळोखे, अशोक डोळेकर, महेंद्र जाधवकर, राजू जाधव, रमेश माळवी, दत्ताजी टिपुगडे आदी उपस्थित होते.