कोल्हापूर (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे दिनांक 10 ते 12 एप्रिल 2025 अखेर श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे. या कालावधीत महाराष्ट्रातून व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक आपआपल्या मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर ये-जा करीत असतात. भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (C) प्रमाणे प्राप्त अधिकाराचा वापर करुन श्री क्षेत्र जोतिबा वाडी रत्नागिरी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथील केर्ली फाटा- गायमुख- जुने आंब्याचे झाड (दानेवाडी क्रॉसिंग)- नवीन एस.टी. स्टॅन्ड- जुने एस.टी. स्टॅन्ड -एमटीडीसी- सेंट्रल प्लाझा -मेन पार्कींग – यमाई पार्कींग -श्रावणी हॉटेल – दानेवाडी फाटा- माले फाटा- म्हसोबा देवालय आणि श्रावणी हॉटेल- गिरोली गाव टी पॉईंट या दरम्यानच्या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व पार्कींग करण्यास मनाई केली आहे.
ही अधिसूचना दिनांक 10 एप्रिल 2025 रोजीचे 20.00 वाजल्यापासून ते दिनांक 12 एप्रिल 2025 रोजीचे 23.00 पर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही या अधिसूचनेत नमुद करण्यात आले आहे.