Monday , April 20 2026
Breaking News

भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपात प्रवेश

Spread the love

 

मुंबई : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या शहरांत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख पक्षांकडून केला जात आहे. आज (8 एप्रिल) रोजी भाजपात अन्य पक्षांचे अनेक नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे कधीकाळी क्रिकेटचे मैदान गाजववलेल्या भारताचा दिग्गज आणि मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव यानेदेखील भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

मुंबईतील कार्यक्रमात केला भाजपात प्रवेश
क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या केदार जाधवने आता भाजपात प्रवेश केल आहे. भाजपात सामील होत त्याने आपली राककीय इनिंग सुरू केली आहे. मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केदार जाधव याने मंत्री तथा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. केदार जाधवचे भापजात येणे हे आमच्यासाठी खूप आनंद देणारे आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी केदाज जाधवचे स्वागत केले.

About Belgaum Varta

Check Also

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *