Sunday , September 8 2024
Breaking News

21 वर्षानंतर शाहु महाराजांच्या भूमीचा पृथ्वीराजने अभिमान वाढविला : पालकमंत्री सतेज पाटील

Spread the love


पुढील महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित केले जाणार
कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरला 21 वर्षानंतर यश मिळाले. शाहु महाराजांच्या भूमीचा पृथ्वीराजने अभिमान वाढविला आहे. सोबतच, इतर वजन गटातील दैदिप्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल 18 कुस्तीगीरांचेही अभिनंदन करुन कुस्ती स्पर्धेतील या यशाबद्दल सर्व पैलवानांचा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नागरी सत्कार केला.
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये 21 वर्षांनी महाराष्ट्र केसरी किताबचा मान कोल्हापूरला मिळवून दिल्याबद्दल पैलवान पृथ्वीराज पाटील यांचा व इतर वजन गटातील दैदिप्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल 18 कुस्तीगीरांचा नागरी सत्कार कोल्हापूर जिल्ह्यातील भवानी मंडप येथे पार पाडला.
पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सर्वांच्या सहकार्याने पुढील वर्षी कोल्हापूर येथे आयोजित करण्याचे आश्वासन देतो. तसेच शासनामार्फत मल्लांना बक्षीस, खुराक व अत्याधुनिक सुविधा होण्याबाबत निधीची कमतरता होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पृथ्वीराजला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व मदत करण्यास आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले. यावेळी, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशिल माने, आमदार राजेश पाटील, आमदार प्रा. जयंत आसगांकर, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील, हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी विनोद चौगुले, हिंदकेसरी दिनानाथ चौगुले, छत्रपती मालोजीराजे यांचे सुपुत्र यशराज, कोल्हापूर जिल्हा व राष्ट्रीय तालीम, आखाडे संघाचे पदाधिकारी, तसेच जिल्ह्यातील विविध तालीम व आखाड्याचे पैलवान व कुस्तीप्रेमी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता पैलवान पृथ्वीराज पाटीलने यावेळी सांगितले की, 21 वर्षानंतर कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरीचे दुष्काळ संपविले पण, ऑलपिंकचे स्वप्न अजूनही अधुरे असून यासाठी सर्वांच्या मदतीचे गरज आहे. सर्वांचे पाठबळ मिळाल्यास 100 टक्के यश मिळेल, असा मला विश्वास आहे.
खासदार संजय मंडलीक यांनी कोल्हापूरला 21 वर्षांनी बहुमान मिळवून देणार्‍या पृथ्वीराजमुळे करवीरवासीय तसेच सर्वच कुस्तीप्रेमीना आनंद झाला आहे. शाहुनगरीत मल्लांना नेहमीच प्रोत्साहन व वाढीव प्रेम मिळते. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय संघाला कुस्ती पैलवानांना अत्याधुनिक वसतिगृहासाठी सदाशिवराव मंडलिक ट्रस्टच्या वतीने 30 लाख रूपयांची घोषणा करण्यात आली. तसेच कार्यक्रम ठिकाणी 1 लाख 51 हजाराचे धनादेशही यावेळी देण्यात आला.
श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांनी पृथ्वीराजच्या कुस्तीतील जिद्द व चिकाटीचे कौतुक केले. शाहु महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्तीतील इतिहासाही आठवण करून महाराष्ट्र शासनाने या खेळाकडे अखंडित व नियमितपणे पाठपुरावा केल्यास विविधस्तरावर तसेच आंतराष्ट्रीय पदके आणण्यास मदत होईल. पैलवान पृथ्वीराजला बक्षीस म्हणून रोख रक्कम 1 लाख रूपयांचा धनादेश यावेळी त्यांनी प्रदान केला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने सातारा येथे संपन्न 64 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विविध विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 18 विजेत्या पैलवानांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागातील 125 किलो वजनीगटात अटीतटीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बानकरवर विजय मिळवत सुवर्णपदक मिळविले होते. 21 वर्षीय पृथ्वीराज पाटील हा मुळचा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथील रहिवाशी आहे. तसेच, स्पर्धेतील गादी विभागात सुवर्णपदक विजेते जिल्ह्यातील वजनगटानुसार 92 किलोमध्ये सुशांत अंबाजी तांबुळकर, पाचाकटेवाडी, करवीर, 70 किलोमध्ये सोनबा तानाजी गोंगाणे, निगवे खालसा, करवीर, 65 किलोमध्ये सौरभ अशोक पाटील, राशिवडे बुद्रुक, राधानगरी यांचा समावेश होता.
गादी विभागात कांस्यपदक विजते 86 किलोमध्ये किरण शिवाजी पाटील, इस्पुर्ली, करवीर, 79 किलोमध्ये भगतसिंह सुर्यकांत खोत, माळवाडी, कोतोली, पन्हाळा, 74 किलोमध्ये स्वप्निल संभाजी पाटील, वाकरे, करवीर, 57 किलोमध्ये अतुला भिमराव चेचर, पोर्ले तर्फे ठाणे, पन्हाळा यांचा समावेश होता.
माती विभागात वजनगटानुसार 74 किलोमध्ये सुवर्णपदक विजेता अनिल लक्ष्मण चव्हाण, नंदगांव, करवीर व 61 किलोमध्ये सुवर्णपदक विजेता विजय बाजीराव पाटील, पासार्डे, करवीर, आणि रौप्यपदक विजत्यामध्ये 79 किलोमध्ये ऋषिकेश उत्तम पाटील, बानगे, कागल, 61 किलोमध्ये ओंकार केरबा लाड, राशिवडे बुद्रुक, राधानगरी, तसेच, कांस्यपदक विजेत्यामध्ये 125 किलोमध्ये संग्राम पंडीत पाटील, आमशी, करवीर, 97 किलोमध्ये बाबासाहेब आनंदा रानगे, आरे, करवीर, 79 किलोमध्ये प्रविण बाजीराव पाटील, चाफोडी, करवीर, 70 किलोमध्ये निलेश आब्बास हिरूगडे, बानगे, कागल, 61 किलोमध्ये ओंकार केरबा लाड, राशिवडे बुद्रुक, राधानगरी, 57 किलोमध्ये अक्षय तानाजी ढेरे, एकोंडी, कागल, 57 किलोमध्ये अमोल बाबुराव बोंगार्डे, बानगे, कागल यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाची प्रास्ताविका तालीम संघाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. महादेवराव आडगळे यांनी केले तर कोल्हापूर शहर अध्यक्ष तालीम संघाचे दिनानाथसिंह यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; 3 सप्टेंबर रोजी तुतारी फुंकणार

Spread the love  कोल्हापूर : फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आश्वासक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *