
माणगांव (नरेश पाटील) : दि. 01 जून रोजी महाराष्ट्र राज्य परिवाहन महामंडळ 74 वर्धापन दिन तसेच 75 व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्षाबद्दल कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम आगार व्यवस्थापक रा.प. माणगांवचे चेतन मुकुंद देवधर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून यंत्र अभियंता (चा.) माने, विभा. भांडार अधिकारी नाळे, रा.प. रायगड विभाग पेण चे आधाव, सहा. पोलीस निरीक्षक माणगांव पोलीस स्टेशन हे आवर्जून उपस्थित होते.
यावेळी सर्व प्रवासी व सर्व कर्मचारी यांचे पेढे/साखर वाटून अभिनंदन करण्यात आले व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तत्पूर्वी आलेल्या पाहुणे यांना आगार प्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, वर्धापन दिनाचा व अमृत महोत्सवी वाटचालीचा केकही कापण्यात आला. यादरम्यान एसटी बस व एसटी स्टॅन्डचे आकर्षक सजावट करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta