Friday , November 22 2024
Breaking News

’कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही’, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानासाठी बाहेर पडण्याला ईडीचा विरोध

Spread the love

मुंबई : कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं स्पष्ट करत ईडीनं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदानाच्या परवानगी अर्जाला विरोध केला आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कसम 62 नुसार हा एक औपचारीक अधिकार आहे, त्यामुळे तो मूलभूत अधिकार होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या दोन्ही आमदारांना ही परवानगी देण्यात येऊ नये, असं ईडीनं कोर्टात दाखल केलेल्या आपल्या उत्तरात स्पष्ट केलं आहे. ईडीच्या या भुमिकेमुळे येत्या शुक्रवारी होणार्‍या मतदानाआधी महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण सहव्या जागेसाठी सध्या एक एत मताची जुळवाजुळव दोन्ही बाजूनं केली जात आहे.
राज्यसभेच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात केला आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दोन्ही अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्दश दिले होते. मंगळवारी ईडीनं आपलं उत्तर कोर्टात सादर केलं असून बुधवारी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर यावर सुनावणी होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये चांगलेच द्वंद्व पहायला मिळत आहे. येत्या 10 जूनला होणार्‍या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह मविआला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यातच मविआचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तर नवाब मलिक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा समावेश असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. या अटीतटीच्या निवडणूकीत त्यांचाही मतांचा लाभ घेण्याचा मविआचा मानस आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत फक्त विधानसभेचे सदस्य मतदानासाठी पात्र असतात आणि मतदान विधानभवनात केलं जातं. त्यामुळे आमदार आणि निवडणूक सदस्य असल्यानं मतदान करण्याची मुभा देण्यात यावी, असं देशमुख आणि मलिक यांनी आपल्या अर्जांमध्ये म्हटलेलं आहे.
सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मलिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, त्यासाठी त्यांना काही तासांसाठी वैद्यकीय देखरेखीखालील रुग्णवाहिनीतून विधानभवनात नेण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मलिक या निवडणुकीत मतदान करू शकतील आणि मतदानानंतर रुग्णालयात परत येतील, अशी विनंती मलिक यांच्यावतीनं करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सेवा आणि पोलीस बंदोबस्ताता खर्चही मलिकच उचलतील, असं आश्वासनही न्यायालयाला देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, विधानभवनाच्या आवारात केवळ 288 आमदारांनाच मतदान करण्यास मुभा आहे, त्यामुळे पोलीस एस्कॉर्ट यासाठी अडथळा ठरणार नाही. मात्र तरीही आपण पोलीस बंदोबस्ताचं शुल्क भरण्यास तयार असल्याचं आश्वासन देशमुख यांच्यावतीनंही न्यायालयाला दिलेलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *