Wednesday , March 4 2026
Breaking News

फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री? आज संध्याकाळी सात वाजता होणार शपथविधी, सूत्रांची माहिती

Spread the love

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज रात्री सात वाजता शपथ घेणार आहेत.
एकनाथ शिंदे हे देखील गोव्याहून मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदे प्रथम भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी सात वाजता शपथ घेणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *