माणगांव (नरेश पाटील) : ज्ञानदेव पवार यांनी गुरुवार दि. 10 रोजी नगराध्यक्ष पदावर विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या दिवशी माणगांव नगरपंचायतीत जाऊन आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी केले. त्यावेळी सर्व कार्यालयीन कर्मचारी तसेच सफाई कामगार उपस्थित होते. नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आणि उपनगराध्यक्ष सचिन बोंबले यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी माणगांव विकास आघाडीचे सह शिल्पकार राजीव साबळे आघाडी, आघाडीतील सर्व नवनिर्वाचित सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी नगराध्यक्ष पवार यांनी कार्यालयीन तसेच इतर वर्गाची बैठक घेऊन महत्वाच्या सूचना देण्यात आल्या, त्यानंतर राजीपचे माजी सभापती राजीव साबळे तसेच ज्ञानदेव पवार यांनी उपस्थित माणगांव विकास आघाडीतील सर्व नूतन सदस्यांना मार्गदर्शन केले. सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर अल्यामुळे सभागृह अस्तित्वात येऊन पुढे सर्व विभागांचे खाते वाटप होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta