Saturday , July 27 2024
Breaking News

हर-हर महादेवाच्या गजरात रथोत्सव

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात आज श्री शंकराचार्य संस्थान मठाची श्री शंकरलिंग रथोत्सव महायात्रा मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात भक्तीमय वातावरणात पार पडली. आज दुपारी ३:४५ वाजता रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. रथ श्री नारायण बनशंकरी मंदिराकडून मिरवणुकीने स्वस्थानी श्री शंकराचार्य संस्थान मठाकडे लाकडी थरप लावून हर-हर महादेवाच्या गजरात सवाद्यसमवेत भक्तीमय वातावरणातय आणण्यात आला. रथाला मठाजवळ पोचण्यास तब्बल साडेतीन तास लागले. रथोत्सवात रथावर भक्तगणांकडून खारीक-खोबऱ्याची उधळण करण्यात आली.  रथावर परंपरागत पद्धतीने नारळ (श्रीफळ) फेकून फोडण्याची प्रथा भक्तगणांनी कायम केली.. रथोत्सवात माजी खासदार रमेश कत्ती, उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसनगौडा पाटील, महेश देसाई, बसवराज बागलकोटी, पृथ्वी कत्ती, बाबूराव मरीगुद्दी, महादेव केसरकर, राजेंद्र कणगली, अभिजित कुरणकर, नगरसेवक संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी, रोहण नेसरी, चिदानंद कर्देण्णावर, नंदू मुडशी, जयप्रकाश सावंत, दिपक भिसे, पुष्पराज माने, राजू बांबरे, प्रकाश नेसरी, अप्पा मोरे, सुभाष कासारकर, मल्लु उमराणी, आणप्पा संगाई, सुहास कुलकर्णी, राजू शिंदे, गिरीश कुलकर्णी, अजय सारापूरे, भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या पाच शतकांपासून चालत आलेली संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सवाची परंपरा अखंडपणे चालत आलेली दिसताहे. यंदा कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत धार्मिक कार्यक्रमांनी रथोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी अष्टमी तिथीची वृध्दी असल्यामुळे रथाचा मुक्काम सलग तीन दिवस नारायण बनशंकरी मंदिराजवळ होता.

रथोत्सवात कत्ती परिवार

संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकरलिंग रथोत्सवात कत्ती परिवार सहभागी झालेला दिसला. आज संकेश्वरच्या यात्रेत माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, हिरण्यकेशी साखर कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती, पृथ्वी कत्ती यांनी सहभागी होऊन श्री शंकराचार्य संस्थान मठात देवदर्शन घेऊन श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचा आर्शीवाद घेतला. श्रींच्या हस्ते रमेश कत्ती यांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. रथसप्तमीला राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी श्री शंकराचार्य संस्थान मठाला भेट देऊन देवदर्शनासह श्रींचा आर्शीवाद घेतला होता. त्याअर्थी संकेश्वरच्या रथोत्सवात संपूर्ण कत्ती परिवार सहभागी झाल्याची चर्चा होताना दिसली.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *