मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरुन संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडं धाव घेत कॅव्हेट दाखल केलं आहे.
भाजपसोबत जात एकनाथ शिंदे गटानं राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानंतर आता शिंदे गट शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर दावा सांगण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडं धाव घेतली आहे. आपली बाजू ऐकल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta