मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना असे म्हणून त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….
विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं एकनाथ शिंदे यांनी टाळलं आहे.
हारतुरे, पुष्पगुच्छ नको, फक्त शुभेच्छा द्या; उद्धव ठाकरे यांचं आवाहन
शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.