मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने राज्य एसआयटीकडून महाराष्ट्र एटीएसकडे हस्तांतरित केला आहे. खर्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी आतापर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचा आरोप करत पानसरे यांच्या कुटुंबियांनी ही मागणी केली होती.
महाराष्ट्र एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र पानसरे कुटुंबिय त्याबाबत समाधानी नाहीत. तसंच तपास एटीएसकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. या मागणीवर राज्य सरकारला काही तरी निर्णय घ्यावाच लागेल, असे सरकारला सुनावले होते. त्याचबरोबर पानसरे कुटुंबियांच्या मागणीवरील निर्णयाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.