मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीमध्येही आरोपी निश्चिती होऊ शकली नाही. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यावेळी आरोप निश्चिती केली जाणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी 7 संशयित न्यायालयात हजर होते. काही संशयितांचे नातेवाईकही न्यायालयात उपस्थित होते.
दरम्यान, गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, त्या संदर्भात आदेश आलेला नाही. तसेच आदेशामध्ये कोणता उल्लेख आहेत हे माहीत नसल्याने सुनावणी कामकाज चालवण योग्य होणार नाही, त्यामुळे पुढील सुनावणीसाठी अॅड. शिवाजीराव राणे यांच्याकडून न्यायालयाकडे पुढील तारीख मिळण्यासाठी विनंती करण्यता आली. या मागणीला आरोपींचे बाजू मांडणारे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनीही संमती दिली. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी परवानगी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta