
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे श्री अंबाबाई चरणी साकडे
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी व चांगली समाजसेवा करण्याचे बळ दे, असे साकडे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आई श्री अंबाबाई चरणी घातले.
पर्यटन मंत्री श्री ठाकरे यांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई (श्री महालक्ष्मी) मंदिरास भेट देऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.
देवस्थान समितीच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. श्री अंबाबाईच्या दर्शनानंतर पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta