मुंबई : स्वराज्यसंकल्पक श्री शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटक राज्यातील दावणगेरे येथील समाधीस्थळाची देखभाल करणाऱ्या श्री शहाजीराजे स्मारक अभिवृद्धी सेवा समितीच्या सदस्यांची आज मुंबईत भेट घेत शहाजीराजे भोसले यांची प्रतिमा देऊन कर्नाटकी पध्दतीने मंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला.
शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील दावणगेरे येथील समाधीस्थळाचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून नुकताच ५ लाख रुपयांचा धनादेश या समधीस्थळाची काळजी घेणाऱ्या श्री शहाजीराजे स्मारक अभिवृद्धी सेवा समितीला सुपूर्द करण्यात आला होता. त्यावेळी समितीच्या सदस्यांना लवकरच मुंबईत प्रत्यक्ष भेटण्याचे वचन दिले होते. त्यानुसार आज या सदस्यांची मुंबईत भेट घेऊन शहाजीराजेचे दावणगेरे येथील समधीस्थळाची जागा पुरातत्त्व खात्याच्या मालकीची असली तरीही त्याच्या आजूबाजूची जमीन खरेदी करून या ठिकाणचा जीर्णोद्धार करण्याची तयारी दर्शवली तसेच प्रत्यक्ष समाधीस्थळी मेघडंबरी उभारण्याचे देखील निश्चित केले. यानुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्याची सूचना देखील समितीच्या सदस्यांना केली.
याप्रसंगी सुप्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार श्री.विश्वास पाटील, संयोजक व राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदचे सभापती महेश पाटील -बेनाडीकर, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सदस्य मंगेश चिवटे, प्रशांत साळुंखे, अतुल चतुर्वेदी तसेच, प्रशांत काळे, छत्र कंन्झर्वेटरचे आर्किटेक अमोल पाटणकर, अमोल महाडीक, सतिश कदम, रोहित बडीगेर, अभिराज जाधव आदि जन उपस्थित होते. श्री शहाजीराजे स्मारक अभिवृद्धी सेवा समितीचे अध्यक्ष मल्लेश शिंदे, सचिव रामचंद्र राव, सदस्य मंजुनाथ पवार, शामसुंदर सूर्यवंशी, अन्नोजी राव पवार, सतीश पवार, किरण शिंदे, सुदर्शन पवार, प्रशांत भोसले, गोविंद राजे भोसले आदी सदस्य उपस्थित होते.