मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीन मिळाल्यानंतर आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत स्पष्टच सांगितलं की, शिवसेना एकच आहे, यामध्ये गट वगैरे काही नाही.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, ‘संजय राऊत माझा जीवलग मित्र आहे. तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतो आहे. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाही.’ संजय राऊत यांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अटकवलं जाऊ शकतं उद्धव ठाकरे केला आहे. मातोश्रीवर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी हे आरोप केले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta