मुंबई : : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त काल (दि.२३) रात्री पासून येत आहे. मात्र त्यांच्या कुटूंबिंयाकडून निधनाचे वृताबाबत नकार देण्यात आला आहे. तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. या संदर्भात आज सकाळी ९.३० च्या दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात येईल.
बुधवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्चास घेतला आहे. डॉक्टरांना याबाबत विचारले असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. तसेच गोखले कुटुंबीयांचे सदस्य याबाबत माहिती देतील असे त्यांनी सांगितले. मात्र अनेक सिनेसृष्टीतील कलाकरांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली.
Belgaum Varta Belgaum Varta