मुंबई : अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणार यावे अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळत आहेत. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया, असा सूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीत उमटला आहे. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.
राज्यात काल घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमी आपला पक्ष पुढे कसा न्यायचा याबाबत आज मनसेची बैठक झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे यावर चर्चा झाली. तसंच ती कशी लढायची यावर राज ठाकरेंनी नेत्यांचं मत जाणून घेतलं.
Belgaum Varta Belgaum Varta