Wednesday , March 4 2026
Breaking News

अजित पवारांना कधी ना कधी मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल, प्रफुल्ल पटेल यांना विश्वास

Spread the love

 

मुंबई : “अजित पवार हे महाराष्ट्राचे वजनदार आणि लोकप्रिय नेते आहे. त्यांना कधी ना कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळेल,” असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते नागपुरात बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत असलेल्या समर्थक आमदारांकडून अजित पवार मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील वक्तव्ये, ट्वीट करण्यात आले होते. त्यातच प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

अजित दादांना पुढच्या काळात कधी ना कधी संधी मिळेल : प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “आज ती जागा रिकामी नाही मग चर्चा कशाला करता? आज अजितदादा नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत, आणि ते आमचे पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आलेले आहेत, काही नवीन गोष्ट नाही आणि असं आहे की कधी ना कधी म्हणजे काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते, आणि अनेक लोकांना मिळालेली आहे, मग अजित दादांना आज नाही म्हणजे कधीपण पुढच्या काळात नक्कीच कधी ना कधी संधी मिळेल,आणि आम्ही देखील त्या दिशेने काम करु.”

About Belgaum Varta

Check Also

नगरपालिकेवरील जीर्ण भगवा ध्वज बदलण्याच्या निर्णया प्रकरणी स्वराज्य रक्षक संघटनेच्या नवनाथ चव्हाण यांना अटक, सुटका

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील स्वराज्य रक्षक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ नामदेव चव्हाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *