Thursday , September 19 2024
Breaking News

मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

Spread the love

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले होते वाच्यता नको

अहमदनगर : मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलताय. काल एक जण काहीतरी बडबला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा. 17 नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. अडीच महिने मी शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांनाच आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं.

फडणवीस साहेब तुमच्या खात्याचा भेदभाव चांगला नाही
जिथे ओबीसी लोक राहतात. तिथे दहशत निर्माण केली जात आहे. मारहाण केली जात आहे. लोक गाव सोडून जात आहेत. न्हावी समाजाच्या दुकानात जायचे नाही असे ठरविले. सर्व नाभिक समाजाने ठरवा एकही मराठा समाजाची कटिंग करायची नाही. फडणवीस साहेब तुमच्या खात्याचा भेदभाव चांगला नाही. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत सभा हे काय सुरू आहे. दाव पर सबकुछ लगा है, रुक नाही सकते, तूट सकते है, लेकिन झुक नही सकते, असे छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटले.

मराठा समाजाच्या नेत्यांची कीव येते
मराठा आमदारांना मत मिळणार नाही. म्हणून मराठा आमदार घाबरत आहेत. आमचे लोक रॅलीला येत नाही. पण, मदत ही करत नाही. निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये आरक्षणवर बोलल्या नाही मला वाईट वाटले. मराठा समाजाच्या नेत्यांची कीव येते. गावागावात ओबीसींना त्रास दिला जातो. तक्रार होत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू
360 कोटी रुपये खोटे रेकॉर्ड तयार करण्यासाठी देण्यात आले का? अशी विचारणा भुजबळ यांनी केली. कुणबी जिथं म्हटलं आहे त्या अक्षरात बदल आहे, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही, असे मुख्याध्यापकचं पत्र आहे. कोणाशी लग्न केलं तरी तुम्ही आरक्षण पात्र ठरणार नाही असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे. खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love    सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात फरार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *