Friday , November 22 2024
Breaking News

लोकसभा आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, आठवड्यात तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक, 72 तासात 62 निर्णय

Spread the love

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागण्यासाठी कांही वेळ शिल्लक असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. आज दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद होत आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताक्षणी देशभरात आचारसंहिता लागू होईल. यानंतर लोकसभा निवडणूक संपेपर्यंत सरकारला कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यासाठी एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. हा एकप्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. यापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या दोन बैठकांमध्ये 45 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. तर शनिवारी झालेल्या बैठकीत आणखी 17 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अवघ्या आठवडाभरात 62 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे

1. राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी (उद्योग विभाग)

2. तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार (वैद्यकीय शिक्षण विभाग)

3. मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला (गृह विभाग)

4. १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.  (विधि व न्याय)

5. संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार (सांस्कृतिक कार्य)

6. शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
(सांस्कृतिक कार्य)

7. विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल (इतर मागास)

8. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ. (पशुसंवर्धन विभाग)

9. हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली “मॅनहोलकडून मशीनहोल” कडे योजना (सामाजिक न्याय विभाग)

10. संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार (गृह विभाग)

11. राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार (गृह विभाग)

12. ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान (परिवहन विभाग)

13. भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप (महसूल विभाग)

14. संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार (गृह विभाग)

15. वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन (सांस्कृतिक कार्य)

16. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर (सामान्य प्रशासन विभाग)

17. श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल व वन)

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *