Friday , October 18 2024
Breaking News

महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी

Spread the love

 

मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मुहुर्त मिळाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ ल. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सदस्यांना शपथ दिली.

महाराष्ट्राच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी विधीमंडळात जोरदार तयारी करण्यात आली होती. उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. राज्यतील विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती मोठी खेळी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली आहे.

या शपथविधी सोहळ्यापूर्वी सर्व आमदारांचे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासोबत फोटो सेशन पार पडले. यावेळी शिंदे गटाचे नेते माजी खासदार हेमंत पाटील यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली. यानंतर शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांनी शपथ घेतली. यानंतर सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर आणि अजित पवार गटाने नेते इद्रिस नायकवडी यांनी आमदारकीची शपथ घेतली. यानंतर भाजप नेते आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी शपथ घेतली. यानंतर वाशिममधील पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांचा राज्यपाल नियुक्त आमदारपदी शपथविधी सोहळा पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड

Spread the love  मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *