Wednesday , December 10 2025
Breaking News

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली आहे. तसंच खडकवासला मतदारसंघाबाबतचाही सस्पेन्स संपवत विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

भाजपने पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर आता आणखी 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या धीरज देशमुख यांच्याविरोधात भाजपने रमेश कराड यांना मैदानात उतरवल्याने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

भाजपची दुसरी यादी

धुळे ग्रामीण – राम भदाणे
मलकापूर – चैनसुख संचेती
अकोट – प्रकाश भारसाकळे
अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
वाशिम – श्याम खोडे
मेळघाट – केवळराम काळे
गडचिरोली – मिलींद नरोटे
राजूरा – देवराव भोंगले
ब्रम्हपुरी – कृष्णलाल सहारे
वरोरा – करण देवतळे
नाशिक मध्य – देवयानी फरांदे
विक्रमगढ – हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर – कुमार आयलानी
पेण – रवींद्र पाटील
खडकवासला – भिमराव तापकीर
पुणे – सुनील कांबळे
कसबा पेठ – हेमंत रासने
लातूर ग्रामीण – रमेश कराड
सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
पंढरपूर – समाधान आवताडे
शिराळा – सत्यजित देशमुख
जत – गोपीचंद पडळकर

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *