Thursday , March 5 2026
Breaking News

संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन

Spread the love

 

पुणे : संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन झाले. डॉ. किसन महाराज साखरे यांनी वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने महाराज साखरे यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यांतच त्यांची प्रणज्योत मालवल्याच माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आज मोठ्या गर्दीत त्यांच्यावर आळंदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. किसन महाराज यांचे थोरले सुपुत्र यशोधन साखरे यांनी साखरे महाराजांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी, त्यांचा भक्त परिवार आणि अनुयायी वर्ग शोकाकूल झाला होता.

किसन महाराज साखरे यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. तसेच आळंदी, देहू परिसर विकास समितीच्या सुकाणू समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवले. याशिवाय ग्रंथराज ज्ञानेश्वरीची दृकश्राव्य प्रत त्यांनी प्रकाशित केली असून त्यांची 115 पेक्षा अधिक पुस्तक प्रकाशित झाली आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर 14 वर्षे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले

महाराजांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भाविकांनी व अनुयायांनी आळंदीत मोठी गर्दी केली होती. आळंदीतून प्रदक्षिणा मार्गाने वैकुंठवासी किसन महाराज साखरे यांच्या पार्थिवाची काढण्यात आली, या अंत्ययात्रेला शोकाकूल वातावरण मोठा जनसागर दिसून आला. आळंदीतील साधकाश्रम येथे त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजनाथ यांच्यासह अनेक महाराज व भक्तगणांनी साखरे महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *