Saturday , March 15 2025
Breaking News

रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा

Spread the love

 

मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून सरकारमधील दोन मंत्र्‍यांच्या राजीनाम्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरुन रस्सीखेंच सुरू असून अंतर्गत कुरघोडी असल्याची देखील चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार रोहित पवार नाराज असल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा होत आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर टीका केली आहे. पक्षातील कामात आपल्याला संधी मिळत नाही. कारण, अजूनही आपण कुठेतरी कमी पडत असू, असे म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्याकडे त्यांनी आपला रोख दर्शवला आहे. आता, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी रोहित पवारांच्या नाराजीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे.

आमदार रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होताना पाहायला मिळतील, असा दावा मावळचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातील नेते सुनील शेळके यांनी केला आहे. तसेच, हल्ली आपण हिंदुत्ववादी असल्याचे दाखवण्याची त्यांची घाई आपण पाहत आहोत. मात्र, आमच्या पक्षात त्यांना घ्यायच की नाही याबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असेही शेळके यांनी म्हटले. जयंत पाटील देखील लवकरच सत्तेत सहभागी झालेले पाहायला मिळतील, त्यांच्या बातम्या सातत्याने समोर येत असल्याचेही आमदार शेळके यांनी म्हटले. त्यामुळे, आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून यावर नेमकं काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

About Belgaum Varta

Check Also

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार

Spread the loveबीड : बीडच्या मस्साजोग गावातले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात खूप गाजले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *